‘राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियाना’ची
उद्दिष्टये
- महाराष्ट्र राज्य कुपोषणमुक्त करणे; अर्थात राज्यातील सर्व बालके साधारण (Normal) श्रेणीत
आणणे.
- स्थानिक स्वराज्य संस्था, जसे- ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा सक्रिय
सहभाग वाढवून कुपोषणमुक्त ग्राम संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे.
- शाश्वत कुपोषणमुक्तीसाठी लोकसहभागास प्रोत्साहन देऊन समाजाच्या सर्व घटकांना
ह्या विषयाशी जोडून एक लोकचळवळ उभी करणे.
जशी विवाह बंधनाची सप्तपदी तशी कुपोषणमुक्तीसाठी
दशपदी
- मातेचे चिकाचे दूध जन्मानंतर एका तासात बाळाला पाजणे
- जन्मानंतर ६ महिन्यांपर्यंत फक्त आईचे दूध बाळाला पाजणे
- ६ महिने झाल्यावर आईच्या दुधासह पूरक आहार सुरू करणे
- पोषण आहारामध्ये सर्व मुख्य आणि सुक्ष्म तत्त्वे उपलब्ध असणे
- पोषण आहाराची वारंवारिता ६ ते ८ वेळा ठेवणे
- रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी गोळी किंवा स्प्रिंकल देणे
- मूल पूर्ण ९ महिन्यांचे झाल्यावर दर ६ महिन्यांनी जीवनसत्त्व देणे
- आयोडिनयुक्त मीठाचे सेवन करणे
- बाळाचे सर्व लसीकरण करणे
- बाळाचे व अन्य व्यक्तींच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट जोपर्यंत होत नाही असे वाटल्यास
तोपर्यंत
- ६ ते २४ महिने बाळाला उकळून थंड केलेले पाणी पाजणे.
- दर ६ महिन्यांनी जंतनाशक औषध देणे.
- हात साबणाने धुवून बाळास पाणी/ औषध पाजणे किंवा भरविणे
कुपोषण संपविण्यासाठी: एखादे कुपोषित
मूल कुपोषित होण्याअगोदर त्याची वाढ थांबते किंवा त्याचे वजन घसरते (Growth faltering
आणि Growth Decline), अशावेळी उपरोक्त १० पैकी काही बाबींमध्ये चूक होत असेल तर दुरूस्त
करावी. बाळाच्या जेवणाची अधिक काळजी घ्यावी. त्याच्या पोटात आधीपेक्षा अधिक अन्न जाईल
यासाठी सर्व उपाययोजना (मुलांच्या आवडीचे, अधिक वेळा, अधिक मात्रा, सर्व तत्त्वे असतील
असे मिक्स करावे.) बाळ आजारी असेल तर लगेच त्याचा उपचार करावा.
‘राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम पुरस्कार’
- कुपोषणमुक्त सर्व गावांना पुरस्कार
- ग्रामीण क्षेत्रांतील (आदिवासी क्षेत्र वगळून) गावांना, रू.१००० व रू.१०० प्रतिबालक
साधारण श्रेणीत आणण्यासाठी रोख बक्षिसे
- आदिवासी क्षेत्रातील गावांना ह्याच कार्यासाठी रू.१०,००० व रू.२०० प्रतिबालक साधारण
श्रेणीत आणण्यासाठी रोख बक्षिसे
- १००% उद्दिष्टय साध्य न करु शकणा-या, परंतु उल्लेखनीय कार्य करणा-या गावांना प्रोत्साहनपर
रोख बक्षिसे
- सहभागी अंगणवाडी सोविका, आरोग्य सेविका, महिला बचतगट प्रतिनिधी, ग्रामसेवक, प्रशिक्षित
दाई व सरपंचांना दि. १ मे २०१२ रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव प्रमाणपत्रांचे वितरण.
- ह्या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट कुपोषणमुक्त तीन गावांना खास रोख
बक्षिसे :
प्रथम रू. १.०० लाख, व्दितीय-रू. ५०,००० /-, तृतीय-रू.२५,०००/-
पुरस्काराचे निकषः
० ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालके साधारण श्रेणीत आणणे,
म्हणजेच कुपोषित व कमी वजनाच्या बालकांची संख्या शून्यावर आणणे.
|
|
|